२५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.

१९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.

१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

१९४१: प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

१९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.

१९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.

१९९९: अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

२००३: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.