२५ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१६९४: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.

१७११: चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.

१८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.

१९११: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१)

१९१६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)

१९२०: इस्रोचे माजी अध्यक्ष आणि अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००२)

१९२२: स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.

१९२२: नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.

१९२५: बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म.

१९२६: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९९४)

१९२८: पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००६)

१९२९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॉन रुदरफोर्ड यांचा जन्म.

१९३२: स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)

१९३८: ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.

१९३९: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)

१९४०: भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.

१९४६: भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.

१९६९: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू हन्सी क्रोनीए यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.