२ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१६१८: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी यांचा जन्म.

१८०५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचा जन्म.

१८७५: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४०)

१८९८: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९९० – मुंबई, महाराष्ट्र)

१९०२: पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल १९६८ – हैदराबाद, तेलंगण)

१९२६: कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९७९)

१९४२: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.

१९६९: हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.

१९७२: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.

१९८१: भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.