१ एप्रिल रोजी झालेल्या घटना.

१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.

१९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.

१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.

१९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.

१९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.

१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.

१९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.

१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.