१ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १६५७)

१६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)

१८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १८९८)

१८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९४०)

१९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.

१९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)

१९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.

१९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.