१ एप्रिल – मृत्यू

१ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

१९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)

१९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.

२०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)

२००३: गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.

२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९२५)

२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)