१ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.

१७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)

१८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर – पुणे)

१८८२: भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

१८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)

१९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)

१९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.

१९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९)

१९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९६७)

१९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७२)

१९४८: मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.

१९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म.

१९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.

१९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.