१ फेब्रुवारी रोजी झालेल्या जन्म.

१८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)

१८८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)

१९०१: अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)

१९१२: संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)

१९१७: चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)

१९२७: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ – सांगली)

१९२९: ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

१९३१: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००७)

१९६०: अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म.

१९७१: क्रिकेटपटू अजय जडेजा यांचा जन्म.

१९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.