१ जानेवारी रोजी झालेल्या घटना.

१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

१८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

१८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.

१८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.

१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.

१८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.

१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.

१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.

१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

१९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.

१९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

१९३२: डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.