१ मे रोजी झालेल्या घटना.

१७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम  ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.

१७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.

१८४०: द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.

१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.

१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.

१८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.

१८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.

१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.

१८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.

१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.

१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.

१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

१९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.

१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.

१९७८: जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.

१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

२००९: स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.

२०१५: दिनविशेष (www.dinvishesh.com) या संकेत स्थळाची सुरवात.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.