१ मे रोजी झालेले जन्म.

१२१८: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १२९१)

१९१३: अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

१९१५: हिंदी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५)

१९१९: पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण पुरस्कृत भारतीय प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३)

१९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)

१९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.

१९४३: नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.

१९४४: केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.

१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.