१ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.

१९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)

१९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

१९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.

१९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.

१९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

१९९६: श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)

२००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)

२००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.