१ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म.( मृत्यू : ४ ऑगस्ट २०२०)

१७९५: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १८७२)

१८१८: कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२)

१८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)

१८९६: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

१९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

१९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.

१९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म.

१९३०: भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०१५)

१९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

१९४५: कृष्णा चेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन) चे आध्यात्मिक नेते भक्ती चारू स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै २०२०)

१९४६: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.

१९४९: लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म.

१९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.