१० एप्रिल रोजी झालेले जन्म.

१७५५: होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १८४३)

१८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०१)

१८४७: हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९११)

१८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९४१)

१८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९८३)

१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)

१९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७१)

१९०७: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)

१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे २०१३)

१९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)

१९३१: शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म.

१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.

१९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु यांचा जन्म.

१९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.