१० एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.

१६७८: रामदास स्वामींची लाडकी कन्या वेणाबाई यांचे निधन.

१८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १७३६)

१९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८८३)

१९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)

१९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)

१९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)

१९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)

२०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.