१० जुलै रोजी झालेल्या घटना.

१८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

१९१३: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.

१९२३: मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

१९२५: अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.

१९२५: तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.

१९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.

१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

१९६२: टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.

१९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.

१९७३: बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.

१९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.

१९९२: मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

१९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.

१९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.

१९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.

२०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

२०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.