१० जून रोजी झालेल्या घटना.

१७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

१९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

१९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

१९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

१९७७: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

१९८२: पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

१९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

२००३: स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.