१० जून रोजी झालेले जन्म.

१२१३: पर्शियन तत्त्वज्ञ फख्रुद्दीन इराकी यांचा जन्म.

१९०८: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)

१९१६: डंचिन डोनट्स चे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २००२)

१९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.

१९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.

१९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९)

१९५५: भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.