१० मे रोजी झालेले जन्म.

१२६५: जपानचा सम्राट फुशिमी यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १३१७)

१८५५: भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९३६)

१८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म.

१९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९७८)

१९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०००)

१९१४: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९२)

१९१८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी २००२)

१९२७: भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.

१९३१: ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांचा जन्म.

१९३७: आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म.

१९४०: प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २०१२)

१९८६: बुद्धीबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.