१० मे रोजी झालेले मृत्यू.

१७७४: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १७१०)

१८९९: रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.

१९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.

१९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

२०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९०९)

२००१: महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३४)

२००२: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९१९)

२०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९४९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.