१० नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१६५९: विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

१९२०: स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर २००४)

१९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

१९३८: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन. (जन्म: १९ मे १८८१)

१९४१: संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८७२)

१९८२: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९०६)

१९९६: सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन. (१६ मे १९२६)

२००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३६)

२००९: अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.(जन्म: १५ ऑगस्ट १९५८)

२०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.