१० ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१९३३:  भारतीय क्रिकेटपटू (महाराष्ट्र) सदाशिव पाटील यांचा जन्म. (निधन: १५ सप्टेंबर २०२०)

१७३१: हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञहेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)

१८३०: स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म.

१८४४: रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.

१८७१: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)

१८७७: मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म.  (मृत्यू: २२ ऑगस्ट १९६३)

१८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)

१९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)

१९०६: इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २००१)

१९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)

१९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.

१९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)

१९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.

१९४६: भारतीय मुस्लिम विद्वान व सहारनपुरमधील मजहीर उलूमचे कुलगुरू सलमान मझिरी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै २०२०)

१९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.