१० ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)

१९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.

१९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)

१९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.

२०००: श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म: १७ एप्रिल १९१६)

२००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.

२००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)

२००८: कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)

२०११: गझल गायक जगजित सिंग यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.