११ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)

१७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)

१८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

१८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)

१८८७: चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७२)

१९०४: गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९४७)

१९०६: संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म.

१९०८: सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७)

१९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.

१९५१: अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.