११ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१९३५: भारताचे १३वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०२०)

१८४३: क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९१०)

१८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९४०)

१८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)

१८९२: पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.

१८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

१९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.

१९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९९६)

१९२२: अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.

१९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २००६)

१९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००२)

१९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)

१९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.

१९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९९)

१९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.