११ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: २ जून १८४०)

१९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)

१९६६: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)

१९९७: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

२००८: मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३१)

२००८: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.