११ जुलै रोजी झालेल्या घटना.

१६५९: अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.

१८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.

१८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.

१९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.

१९१९: नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.

१९३०: ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.

१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.

१९५५: अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले.

१९७१: चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९७९: अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

१९९४: पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

२००१: आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.

२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.