११ जून रोजी झालेल्या घटना.

१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

१८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.

१९०१: न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

१९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

१९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.

१९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

१९७२: दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.

१९९७: सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

१९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर  कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.

२००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

२००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.