११ जून रोजी झालेले मृत्यू.

ख्रिस्त पूर्व ३२३: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन. (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)

१७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०)

१९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)

१९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)

१९८३: भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९४)

१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)

१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)

१९९७: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)

२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.