११ मार्च रोजी झालेले मृत्यू.

१६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. (जन्म: १४ मे १६५७)

१९५५: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

१९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.

१९६५: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

१९७०: अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १८८९)

१९७९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.

१९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)

२००६: सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १९४१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.