११ मे रोजी झालेले जन्म.

१९०४: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९८९)

१९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा   जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५)

१९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)

१९१८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)

१९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.

१९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.