११ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१८२१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)

१८५१: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू:४ जानेवारी १९०८ – मुंबई)

१८७२: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९३७)

१८८६: लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)

१८८८: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८२)

१८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)

१९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)

१९११: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९९१)

१९२४: कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९९६)

१९२६: विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००३)

१९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

१९३६: हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.

१९४२: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)

१९६२: अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.