११ ऑक्टोबर – जन्म

१८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)

१९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)

१९१६: पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)

१९१६: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९७)

१९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

१९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)

१९४२: चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म.

१९४३: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९९६)

१९४६: परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.

१९५१: हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म.