१२ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१८७२: राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९४८)

१८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८)

१८९२: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९६५)

१९०५: लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)

१९०७: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)

१९१५: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९९८)

१९२५: भारतीय क्रिकेटर दत्ता फडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९८५)

१९२७: इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९०)

१९४०: राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म.

१९५०: प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म.

१९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.