१२ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन.

१९६४: हिन्दी राष्ट्रकवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)

१९९१: शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन.

१९९२: साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)

२०००: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)

२००५: हिंदी चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९१७)

२००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)

२०१२: सतार वादक, भारतरत्‍न पण्डित रवी शंकर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२०)

२०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)

२०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.