१२ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)

१८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)

१८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२)

१८९३: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९४६)

१८९९: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)

१९०२: महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९६९)

१९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)

१९१७: महर्षी महेश योगी यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)

१९१८: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)

१९४९: भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ७ वेळा आमदार पारसनाथ यादव यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २०२०) 

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.