१२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४)

१९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १८९६)

१९७६: इंग्लिश रहस्यकथालेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)

१९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)

१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचे निधन.

२००५: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन. (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.