१२ जून रोजी झालेल्या घटना.

१८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.

१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

१९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.

१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

१९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

१९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

२००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.