१२ मे रोजी झालेले जन्म.

१८२०: परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेंन्स नाईटिगेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०)

१८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)

१८९९: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००२)

१९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)

१९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३)

१९०७: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.