१२ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१८१७: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १८९२ – आक्रा, इस्त्राएल)

१८६६: चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष सन यट-सेन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९२५)

१८८०: सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा पारनेर, जि.अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

१८८९: रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)

१८९६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८७)

१९०४: समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू  श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल १९८९)

१९४०: हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९९२ – मुंबई)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.