१२ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१९४६: बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८६१)

१९५९: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

१९५९: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८६)

१९९७: वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे पुणे येथे निधन.

२००५: रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९२४)

२००७: भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१९)

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९४६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.