१३ एप्रिल रोजी झालेल्या घटना.

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.