१३ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१९७१: भारतीय फुटबॉल खेळाडू कार्ल्टन चॅपमन यांचा जन्म.( निधन: १२ ऑक्टोबर २०२०)

१७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)

१९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.

१९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.

१९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)

१९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.

१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.

१९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.