१३ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)

१९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)

१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.

२००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.