१३ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१८८८: स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९४६)

१८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९१८)

१८९८: लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६९)

१८९९: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

१९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९८)

१९२६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१६)

१९३६: चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला यांचा जन्म.

१९४५: भारतीय-इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म.

१९८३: भारताचा ९ वा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.