१३ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन. (जन्म: ३१ मे १७२५)

१८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)

१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. (जन्म: १२ मे १८२०)

१९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८६०)

१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)

१९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)

१९७१: बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले यांचे निधन.

१९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१०)

१९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९००)

१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन.

२०००: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९६५)

२०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२८)

२०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९२१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.