१३ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

१७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.

१९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)

१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.

१९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.

१९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)

२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)

२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.

२०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.