१३ मे रोजी झालेले मृत्यू.

१६२६: अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.

१९०३: फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८६४)

१९५०: प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)

२००१: लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)

२०१०: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ – मणेराजूरी, सांगली)

२०१३: भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.