१३ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.

८१: रोमन सम्राट टायटस यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर ३९)

१८९३: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८३८)

१९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५८)

१९२९: क्रांतिकारक जतीनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६३ व्या दिवशी निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९०४)

१९७१: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्‍नागिरी, महाराष्ट्र)

१९७३: भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)

१९७५: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)

१९९५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष  डॉ. महेश्वर नियोग यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)

१९९७: प्रसिद्ध गीतकार लालजी पांडेय तथा अंजान यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १९३०)

२००४: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२५)

२०१२: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.