१४ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१६२९: डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १६९५)

१८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)

१९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

१९१९: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)

१९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७५)

१९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)

१९२७: विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.

१९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.

१९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.